आकर्षक सौंदर्यासाठी काही सोप्या टीप्स!

त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी, त्वचेला योग्यरित्या पोषण मिळवून देणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्वजेतील तेजस्वीपणा टिकवूण ठेवण्यासाठी, आरोग्यदायी अन्न सोडू नका. आरोग्य आणि सौंदर्य क्षेत्रातील उपभोक्ता उत्पादन आणि सेवा प्रदान करणाऱ्या एका कंपनीच्या त्वचा विशेषतज्ज्ञांनी त्वचेला कांतिमय बनविण्यासाठी काही अशाच टिप्स दिल्या आहेत.

त्वचेला टवटवीत आणि त्वचेतीली पोषण टिकवून ठेवण्यासाठी त्यात ओलावा टिकवून ठेवणे हा रोजच्या रोज शारीरिक निगेचा भाग झाला पाहिजे. हाता-पायांकडे दुर्लक्ष करू नये.

तरूण आणि कांतीमय रूपासाठी आठवड्यातून दोन वेळा त्वचे वरील मृत त्वचा काढून टाकणे, फार गरजेचे असते. यासाठी घरच्याघरी मध आणि साखरेच्या दान्यांचे मिश्रण करून,

त्याचा लेप बनवून लावला जाऊ शकतो.

ताजी फळं, नारळाचं पाणी, रुचिरा, बदाम यांनी परिपूर्ण संतुलित आहार घ्या किंवा आरोग्याला पोषणयुक्त पदार्थ घेणे उपयुक्त ठरतं.

त्वचेतील ओलावा टिकूण राहण्यासाठी, घरच्या घरीही लेप तयार करता येऊ शकतात. पपईचा लगदा करून आणि मध यांचे समप्रमाणात मिश्रण करून, चेहऱ्यावर १५ मिनटं त्या मिश्रणाने मसाज करावा. त्यानंतर तो थंड पाण्याने धुवावा.

Who's Online

We have 35 guests and no members online

 
  

New Collection